'प्रियंका ताई, दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे…', शीतल म्हात्रेंचा इशारा

‘प्रियंका ताई, दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे…’, शीतल म्हात्रेंचा इशारा

| Updated on: May 09, 2024 | 2:59 PM

एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या तर यावेळी गर्दीतून गद्दार, गद्दार असा आवाज आला. तर ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार, असं चतुर्वेदी म्हणाल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारसभेत हल्ला चढवला.

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एका प्रचारसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या तर यावेळी गर्दीतून गद्दार, गद्दार असा आवाज आला. तर ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार, असं चतुर्वेदी म्हणाल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी मुंबईतील प्रचार सभेत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’चा उल्लेख केला. ‘दीवार’ सिनेमात ‘मेरा बाप चोर हैं’ असं दाखवलंय, तसच श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. असं लिहिलंय. प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उत्तर दिलय. बघा काय केला पलटवार?

Published on: May 09, 2024 02:59 PM