गद्दारी, दावोसचा दौरा अन् गुलाबी थंडी; प्रियंका चतुर्वेदी अन् शीतल म्हात्रेंमध्ये वार-पलटवार
एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या तर यावेळी गर्दीतून गद्दार, गद्दार असा आवाज आला. तर ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार, प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदेंवर केलेल्या सडकून टीकेवर शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांचं प्रत्युत्तर काय?
गद्दारीच्या टीकेवरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि शिंदे गटात वाद सुरू झालाय. दिवार सिनेमाचा दाखल देत प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दार हा शिक्का कपाळवर मारला गेल्याची टीका शिंदेंवर केली. त्यावरून प्रियंका चतुर्वेदी यांना शिंदे गटाच्या नेत्यांनी लक्ष्य केलंय. एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या तर यावेळी गर्दीतून गद्दार, गद्दार असा आवाज आला. तर ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार, असं चतुर्वेदी म्हणाल्या. तर श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. असं लिहिलंय, असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी दावोसच्या दौऱ्यावरून सवाल केलेत. त्यावर आपण कधीच दावोसला गेलेले नाही, असं म्हटलं. गद्दार सेनेच्या महिला फक्त गद्दार नाहीत तर खोटारड्याही आहे, असं चतुर्वेदी म्हणाल्या.