आदित्य ठाकरे हे शोले चित्रपटातील ‘असरानी’, कुणी केली खोचक टीका?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत आम्ही शंभर टक्के अपात्र होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही, आम्ही कुठला ही कायदा मोडला नाही त्यामुळे अपात्र होण्याचा विषयच येत नाही.
सातारा, १० जानेवारी २०२४ : शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत आम्ही शंभर टक्के अपात्र होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही, आम्ही कुठला ही कायदा मोडला नाही त्यामुळे अपात्र होण्याचा विषयच येत नाही. गावाकडचा एक सरपंच राष्ट्रीय अध्यक्षाने फोन करून सुद्धा अपात्र होत नाही तर सोळा आमदार अपात्र करणं खायची गोष्ट आहे का? जे विरोधक अपात्र तेचे आरोप करत आहेत ते संजय राऊत किंवा इतर कोणी असतील त्यांनी कधी ग्रामपंचायतची निवडणूक तरी लढवली आहे का? ग्रामपंचायतची निवडणूक न लढलेले लोक आम्हाला आपत्र करण्याच्या गोष्टी करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तर आदित्य ठाकरे आज सातारा दौऱ्यावर आहेत पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे दौरे वाढले आहेत या प्रश्नावर बोलत असताना त्यांनी उबाठा गटाचे शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना शोले मधील आसरानीची उपमा देत जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले शोले मधील आसरानी सुद्धा सगळीकडे फिरायचा आणि म्हणायचा आधे इधर आधे उधर बाकी मेरे पीछे आओ त्यामुळे ते पीछे कोण आहे का बघायला फिरत असतील असा टोला यावेळी बोलत असताना लगावला.