Anil Babar death : एकनाथ शिंदे यांचे विश्वासू, अनिल बाबर यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

Anil Babar death : एकनाथ शिंदे यांचे विश्वासू, अनिल बाबर यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

| Updated on: Jan 31, 2024 | 12:20 PM

शिंदे गटाचे सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मिक निधन झालं ते 74 वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्याने मंगळवारी दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

मुंबई, ३१ जानेवारी, २०२४ : एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि शिंदे गटाचे सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मिक निधन झालं ते 74 वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्याने मंगळवारी दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आज त्यांचं निधन झालं. सांगली जिल्ह्यातील शिंदे गटाचे ते एकमेव धडाडीचे आमदार होते. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण परिसरात आणि सांगली जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 7 जानेवारी 1950 रोजी अनिल बाबर यांचा जन्म झाला. त्यांची राजकीय कारकीर्द तितकीच मोठी आहे. 1972 साली वयाच्या 22 व्या वर्षापासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणात सक्रीय असताना अनिल बाबर यांनी साखर कारखाने आणि जिल्हा बँकेवरही पदं भूषवली आणि उत्तम कामगिरी केली. त्यामुळे ते जनतेच्या कायम मनात होते.

Published on: Jan 31, 2024 12:20 PM