‘स्वाभिमान दिन की लाचार?’ ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदे गटाला वर्धापन दिनावरून टोला
वरळीतील नेस्को मैदानात शिंदे गटाचा कार्यक्रम होता. तर षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा कार्यक्रम. यावेळी एकाच वेळी दोन्ही कार्यक्रम असल्याचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.
मुंबई : शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन दोन्ही गटांकडून जोरदार साजरा करण्यात आला. दोन्ही गटांकडून याची जय्यत तयारी करण्यात आली होती. तर वरळीतील नेस्को मैदानात शिंदे गटाचा कार्यक्रम होता. तर षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा कार्यक्रम. यावेळी एकाच वेळी दोन्ही कार्यक्रम असल्याचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अपेक्षा प्रमाणे दोन्ही पक्षांत आज भाषणांची जुगलबंदी रंगली. यावेळी ठाकरे गटाकडून शिंदे गटावर हल्लाचढवताना त्यांनी गद्दार दिन साजरा करावा अशी टीका करण्यात आली होती. त्यावरून शिंदे गटाकडून पलटवार झाला होता. तर आता तुम्हीच गद्दार आहात त्यामुळे तो दिवस तुम्हीच साजरा करा. आम्ही स्वाभिमान दिवस साजरा करू असे अनेक शिंदे गटातील नेत्यांनी म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी, मेळाव्याच्या आधी शिंदे गटावर हल्ला चढवला. तसेच स्वाभिमान दिवस की लाचार दिवस असा सवाल करत खोचक टीका केली. तर लाचारी आणि स्वाभिमान यातील फरक कळतो का असेही विचारणा त्यांनी केली. तर दुसऱ्यांची भांडी धूत फिरला असाही टोला शिंदे गटाला लगावला.