Shiv sena : शिवसेनेचं लोकसभेतील कार्यालय आमच्याच ताब्यात, विनायक राऊतांची माहिती
शिंदे गटाने लोकसभा गटनेतेपदावर दावा करणार पत्र 19 जुलैला दिलं होतं. यावर विनायक राऊत सवाल केलाय. तर लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयाबद्दल विचारण्यात आलं. यावर ते आमच्याच ताब्यात असल्याचं म्हटलंय.
नवी दिल्ली : ‘शिवसेनेचं (shivsena) लोकसभेतील कार्यालया आमच्याच ताब्यात आहे. शिवसेना नेते संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजन विचारे, प्रियंका चतुर्वेदी असे आम्ही सर्व रोज त्या कार्यालयात बसतो,’ अशी माहिती शिवसेना नेते विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभेच्या गटनेतेपदावरुन शिवसेना आणि शिंदे (Eknath Shinde) गटात पुन्हा एकदा वाद रंगला आहे. मात्र, यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे (rahul shewale) यांची लोकसभेच्या गटनेतेपदी केलेली नियुक्ती केली आहे. ती नियुक्ती चुकीची असून हा शिवसेनेवर अन्याय आहे. हा नैसर्गिक न्याय नाही, असा आरोप शिवसेना नेते विनायक राऊत (vinayak raut) यांनी केलाय. याचवेळी त्यांना लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयाबद्दल विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी ते कार्यालय आमच्याच ताब्यात असल्याचं म्हटंलय.