‘तुम्ही बाकी समाजाचा का इतिहास काढत नाही, तिथे ××× का तुमची’; शिंदे गटाच्या नेत्याचा भिडे यांना सवाल
ते अनेक वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आताही त्यांनी महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असून करमचंद गांधी त्यांचे खरे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे वडिल आहे असं वक्तव्य भिडेंनी केलं होतं. त्यावरून आता नवा वाद पेटला आहे.
औरंगाबाद, 29 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरूजी (Sambhaji Bhide) यांचं वादग्रस्त विधानांमुळे अनेक वेळा राज्यात खळबळ उडाली आहे. ते अनेक वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आताही त्यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असून करमचंद गांधी त्यांचे खरे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे वडिल आहे असं वक्तव्य भिडेंनी केलं होतं. त्यावरून आता नवा वाद पेटला आहे. यावरून शिंदे गटाचे नेते शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी देखील आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी भिडे यांच्यावर टीका करताना, भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. भिडे गुरुजींवर कारवाई केली जाईल, असे वक्तव्य खपवून घेणार नाही. ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात. कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर भिडे गुरुजी यांचा इतिहास काढला तर त्यांना कसं वाटेल, त्यांना दाखला दिला का इतिहास काढायचा, हे महात्मा झाले का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर वादग्रस्त वक्तव्यावर ही पक्षाची आणि आपली भूमिका असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. तुम्ही बाकी समाजाचा का इतिहास काढत नाही, तिथे फातटे का तुमची असा हल्लाबोल केला आहे.