'राज्यातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय राऊत, केवळ पुड्या...', कुणी केली खोचक टीका

‘राज्यातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय राऊत, केवळ पुड्या…’, कुणी केली खोचक टीका

| Updated on: Apr 25, 2023 | 9:49 AM

VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल; म्हणाले, 'सध्या त्यांना काहीही काम उरलेलं नाही म्हणून ते...'

ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पायउतार होणार असा दावा केला. इतकेच नाही तर दिल्लीत तशा हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्यावर शिंदे यांच्या शिवसेनेतून आक्रमक प्रतिक्रिया येतांना दिसत आहे. अशातच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्व म्हणजे संजय राऊत आहे. सध्या त्यांना काहीही काम उरलेलं नाही. केवळ पुड्या टाकण्याचं काम ते करत असतात. सध्या सामना कोणीही घेत नाही , सकाळी प्रिंट झालेला सामना असतो तो रात्री पुड्या बांधण्याचे काम ते करत असतात. पुड्या बांधाव्या लागतात म्हणून त्या त्रागातून अशी वक्तव्य ते करत असतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही.’

Published on: Apr 25, 2023 09:44 AM