‘हलक्या कानाचा असणं हे देश सांभाळण्यासाठी योग्य नाही’, शिवसेना नेत्याचं टीकास्त्र
VIDEO | 'ते देशाचं नेतृत्व काय करणार', शिवसेना नेत्याची नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार टीका केली जात आहे. अशातच उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करणार असल्याची चर्चाही होत आहे. यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ज्या लोकांना आपले 40 आमदार आणि 13 खासदार सांभाळता आले नाहीत. ज्या प्रमाणे नेते त्यांना सांभाळता आले नाहीत, त्यांना पक्षही सांभाळता आला नाही. ते देशाचे नेतृत्व काय करणार. हलक्या कानाचा असणं हे देश सांभाळण्यासाठी योग्य नाही, अशी खोचक टीका नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली आहे. राजकारणातील सत्तापिपासू वृत्तीमुळे आणि मुख्यमंत्री पदासाठी आपले ज्यांनी आपले विचार सोडले आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जाऊन बसले ते देश काय सांभाळणार आहेत असा घणाघात त्यांनी ठाकरे गटावर केला आहे.