विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा; बघा व्हिडीओ
अंबादास दानवे यांचा तोल सुटल्याने भाजप नेते प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या मुद्द्यावर काहीसा गदारोळ झाला. नेमकं काय घडलं सभागृहात? काय म्हणाले अंबादास दानवे? बघा व्हिडीओ
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांची विधान परिषदेतील सभागृहाच आज जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. अंबादास दानवे यांचा तोल सुटल्याने भाजप नेते प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या मुद्द्यावर काहीसा गदारोळ झाला. दरम्यान, अंबादास दानवे आपली भूमिका मांडत असताना सत्ताधारी आमदारांनी आरडाओरड केली. यानंतर अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर भर सभागृहात शिवीगाळ केली. यावेळी भर सभागृहात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचा प्रकार पाहायला मिळाला. नेमकं काय घडलं सभागृहात? काय म्हणाले अंबादास दानवे? प्रसाद लाड यांना का केली शिवीगाळ? बघा व्हिडीओ
Published on: Jul 01, 2024 05:38 PM
Latest Videos