दलाल, औलाद, सुपारीखोर ते भुंकणारा कुत्रा... राणेंवर टीका करताना ठाकरे गटाच्या नेत्याची जीभ घसरली

दलाल, औलाद, सुपारीखोर ते भुंकणारा कुत्रा… राणेंवर टीका करताना ठाकरे गटाच्या नेत्याची जीभ घसरली

| Updated on: Sep 03, 2024 | 2:28 PM

रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलाल, तर मशिदीत घुसून चून चून के मारेंगे असा इशारा नितेश राणे यांनी दिला. नितेश राणे यांचं प्रक्षोभक वक्तव्य आणि कृतीमुळे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर ते आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे.

नाशिक येथील सिन्नरच्या प्रवचनात सराला बेटच्या महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. यानंतर हिंदूंतर्फे ठिकठिकाणी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येतायत. अशातच अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणेही सहभागी झाले होते. राणे यांनी या मोर्चातही मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक भाषण केले. याविरोधात नारायण राणेंवर गुन्हाही दाखल करण्यात आला. नगरमध्ये बोलताना, रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी बोललं, कोणी मस्ती केली तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे, असे नितेश राणे म्हणाले. याच वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “मशिदीकडे बघून गोळी झाडल्याचा इशारा करतोस, मात्र राज्यातील जनता तुझे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही” असं शरद कोळी म्हणाले.

Published on: Sep 03, 2024 02:28 PM