ठाकरे गटातील नेता आक्रमक, देवेंद्र फडणवीसांच्या घरापर्यंत काढणार पदयात्रा; कारण काय?
VIDEO | ठाकरे गटातील 'हा' नेता येत्या 10 एप्रिलपासून अकोला ते नागपूर पदयात्रा काढणार, काय आहे कारण?
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे मतदारसंघातील पाणीप्रश्नावरून पुन्हा आंदोलन करणार आहेत .येत्या 10 एप्रिलपासून अकोला ते नागपूर पदयात्रा काढण्यात येणार आहे तर अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून या पदयात्रेला सुरूवात होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत आमदार नितिन देशमुख पदयात्रा काढणार आहे. बाळापूर मतदार संघातील 69 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठीचं तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचं पाणी आरक्षण रद्द केल्याने आमदार देशमुख चांगलेच आक्रमक झाले आहे. दरम्यान आमदार देशमुखांनी याआधी अधिवेशनात विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषण केलं होतं,अशी माहिती आज ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली आहे.