Omraje Nimbalkar यांचा सरकारला मराठा आरक्षणावरून इशारा; म्हणाले, 'अजूनही वेळ गेली नाही तर...'

Omraje Nimbalkar यांचा सरकारला मराठा आरक्षणावरून इशारा; म्हणाले, ‘अजूनही वेळ गेली नाही तर…’

| Updated on: Sep 17, 2023 | 1:50 PM

VIDEO | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर काय साधला जोरदार निशाणा, बघा काय व्हिडीओ, केली शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका

धाराशिव, १७ सप्टेंबर २०२३ | ‘अजूनही वेळ गेली नाही तर केंद्रात मराठा आरक्षण टिकणारं विधेयक आणावं’, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा ट्रिपल इंजिन सरकारने आपलं राजकीय वजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वापरावं, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. तर केंद्रात आरक्षण टिकणारं विधेयक न आणल्यास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आंदोलन करू, असा इशाराही राज्य सरकारला दिला आहे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने जी आरक्षणाची योग्य मर्यादा आहे, ती वाढवण्यासाठी लोकसभेत कायदा आणावा, अशी मागणीही ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारकडे केली.

Published on: Sep 17, 2023 01:49 PM