‘…म्हणून दादरसारख्या भागात अमित ठाकरे हरले’, उद्धव ठाकरेंच्या हिंदी भाषिक प्रवक्त्यानं सांगितलं दारूण पराभवाचं कारण
मनसेला भाजपचा पाठिंबा आहे, कधी बिन शर्त पाठिंबा, कधी पाठिंबा... शिवसेना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यानंतरही मराठी भाषेवरील मारपीट थांबली नाही तर आम्ही कायदेशीर कारवाईची मागणी करू, असं दुबे म्हणाले.
मुंबईत मनसे मराठी भाषेबाबत आक्रमक भूमिका घेत असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मनसेला घाबरू नका, असे अमराठी भाषिक लोकांना सांगितले आहे. इतकंच नाहीतर आम्ही मराठी भाषा शिकवणार, असे बॅनर लावून लोकांना जागृत केले आहे. आनंद दुबे यांनी अंधेरीसह अनेक भागात ही बॅनरबाजी केली आहे. दरम्यान, मराठी भाषेवरून मनसे आक्रमक झाली असून राज्यभरातील अस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर करा, असे निवेदन मनसैनिकांकडून दिले जात आहे. यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देत खळखट्याकचा इशाराच त्यांनी दिला आहे. यासंदर्भात आनंद दुबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अधूनमधून अमराठी लोकांना मारहाण करत आहेत आणि त्यांना मराठीत बोलण्यास सांगत आहेत. नाहीतर ते त्यांना मारहाण करतील असे सांगत आहेत, पण ते असे म्हणत नाहीत की जर तुम्हाला मराठी येत नसेल आणि तुम्हाला ती शिकायची असेल तर आम्ही तुम्हाला शिकवू. त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.’, असे दुबे म्हणाले तर मराठी लोकंही मनसेला पाठिंबा देत नाहीत. हे विधानसभा निवडणुकीला पाहिलं. तर लोकांना मारणे थांबवा, असं म्हणत सध्या सुरू असलेल्या मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना दुबेंनी एकच विनंती आहे.

सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत

दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका

जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव

आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
