Sanjay Raut on Mohan Bhagwat : …तर मोहन भागवतांनी सरकार पाडावं; संजय राऊत यांचं आव्हान
शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना खुलं आव्हान दिलं आहे. मोहन भागवत यांनी हे सरकार खाली खेचावं. त्यांच्या तेवढी क्षमता आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना नेमकं काय दिलं आव्हान?
‘हे सरकार राष्ट्राचा हिताचं नाही. राष्ट्राच्या अखंडतेचं नाही. तर मोहन भागवत यांनी हे सरकार खाली खेचावं. त्यांच्या तेवढी क्षमता आहे’, असं वक्तव्य करून शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना खुलं आव्हान दिलं आहे. मोहन भागवत यांनी मौन सोडत मणिपूरबाबत वक्तव्य केले. आता निवडणुकीचा प्रचार संपलाय. कटुता संपवा आणि मणिपूरकडे लक्ष द्या, असे मोहन भागवत यांनी म्हटले. यावरूनही संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जर मोहन भागवत यांना काही वाटत असेल तर सरकारला हटवा. मोहन भागवत यांच्या आशीर्वादाने सरकार सुरू आहे. जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून बाजूला करून पहा. तुम्ही आशीर्वाद सरकारला का देताय? मोहन भागवत यांनी संघ आणि भाजपचा काही संबंध नाही, असे स्पष्टपणे सांगावे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला आहे.