शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी; बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी खुलं? उद्धव ठाकरे म्हणाले....

शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी; बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी खुलं? उद्धव ठाकरे म्हणाले….

| Updated on: Jun 18, 2024 | 3:36 PM

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी स्मारक राज्यातील जनतेसाठी कधी सुरु होणार? स्मारकाचं काम कधी होणार? याची माहिती दिली. या पाहणीनंतर त्यांनी स्मारक राज्यातील जनतेसाठी कधी सुरु होणार? स्मारकाचं काम कधी होणार? हे ही सांगितले

एमएमआरडीएच्या माध्यमातून दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या कामाची शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी स्मारक राज्यातील जनतेसाठी कधी सुरु होणार? स्मारकाचं काम कधी होणार? याची माहिती दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, स्मारकाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर खरे काम सुरु होणार आहे, ज्यामध्ये बाळासाहेबांच्या आयुष्याची माहिती देणारं इंटरिअरचे हे काम असणार आहे. त्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्ण जीवनप्रवास देण्यात येणार आहे. २३ जानेवारी २०२५ पर्यंत हे स्मारक जनतेसाठी आणि शिवसैनिकांसाठी लोकार्पण करता येईल, असा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात जनतेकडे जी कोणतीही माहिती, बाळासाहेबांचे फोटो, लेख, बातम्या किंवा इतर माहिती असेल ती त्यांनी शिवसेना भवन किंवा स्मारकावर आणून द्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Published on: Jun 18, 2024 03:36 PM