Sushma Andhare यांचे पती वैजिनाथ वाघमारे यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
VIDEO | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केल्याचा आरोप, या घटनेनंतर एकच खळबळ, कधी घडली घटना?
बीड, १८ सप्टेंबर २०२३ | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेनंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या हल्ल्यातून मात्र सुदैवाने वैजनाथ वाघमारे बचावले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील एका बैठकीवरून घरी परतत असताना काही हल्लेखोरांनी वाघामारे यांची गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर अचानक दगडफेक करण्यात सुरूवात केली. यानंतर ते गोंधळले तर दगडाने हल्ला करत गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. तर मला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. पण मागणी करूनही मला सुरक्षा देण्यात आली नाही, अशी खंत वाघमारे यांनी हल्ल्यानंतर बोलून दाखवली.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..

रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा

'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?

काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
