राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार आणि जिंकणारही- संजय राऊत

राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार आणि जिंकणारही- संजय राऊत

| Updated on: May 21, 2022 | 3:35 PM

राऊत यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सहाव्या जागेबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत संभाजी छत्रपतींना ही जागा सोडणार नसल्याचं सांगितलं. मात्र, संभाजी छत्रपतींना राज्यसभेवर जायचं असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा या अटीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांचं राज्यसभेवर जाणं कठिण होताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यानी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackeray) यांची भेट घेतली. तब्बल दोन ते अडीच तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर राऊत यांनी राज्यसभेच्या जागेबाबत कोणतीही खलबतं झाली नसल्याचं सांगितलं. मात्र, राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. राऊत यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सहाव्या जागेबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत संभाजी छत्रपतींना ही जागा सोडणार नसल्याचं सांगितलं. मात्र, संभाजी छत्रपतींना राज्यसभेवर जायचं असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा या अटीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

Published on: May 21, 2022 03:35 PM