Special Report | उत्तर प्रदेशातून शिवसेनेनं मोदींविरोधात दंड थोपटले, लोकसभेला 100 जागा लढवण्याची घोषणा
उत्तर प्रदेश फक्त झांकी आहे, लोकसभा निवडणूक अजून बाकी आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिलाय.
उत्तर प्रदेश फक्त झांकी आहे, लोकसभा निवडणूक अजून बाकी आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिलाय. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही कमी जागांवर लढतोय. आम्ही फक्त 50-55 जागांवर लढतोय. हा पक्षविस्ताराचा कार्यक्रम आहे. पाचव्या टप्प्यासाठी पश्चिम उत्तर प्रदेश, लखनऊच्या आसपास, अयोध्या, बांका फैजाबाद येथे उमेदवार उभे केले आहेत. शिवाय सहाव्या-सातव्या टप्प्यासाठी अलाहबाद, वाराणसी येथे उमेदवार देणार आहोत. खरे तर ही 2027 ची तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशात आम्ही लोकसभा लढतोय. देशभरात 100 उमेदवार उभे करण्याचा आमचा विचार आहे. तशी चाचपणी सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
Published on: Feb 05, 2022 11:58 PM
Latest Videos