Special Report | शिवसेना नेमकी कोणाची ? फैसला ठाकरेंच्या बाजूनं की शिंदेंच्या?

Special Report | शिवसेना नेमकी कोणाची ? फैसला ठाकरेंच्या बाजूनं की शिंदेंच्या?

| Updated on: Aug 22, 2022 | 11:42 PM

शिंदेंना गटनेते पदावरुन हटवणे आणि गोगावलेंचं मुख्य प्रतोदपद रद्द करण्याच्या विरोधातही शिंदे गटानं याचिका केलीय. त्यामुळं सुप्रीम कोर्ट फैसला सुनावणार की प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवणार याचाही निर्णय होईल. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) ही लढाई निष्टा विरुद्ध पैसा असल्याचं म्हटलंय.

मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा फैसला, पुढच्या काही तासांमध्ये सुप्रीम कोर्टात होणार आहे..याआधी 3 वेळा सुनावणी पुढं ढकलण्यात आली. मात्र आता प्रत्यक्ष सुनावणीची वेळ आलीय. त्यामुळं 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या याचिकेवर कोर्ट निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  विशेष म्हणजेच अपात्रतेसंदर्भातल्या याचिकेविरोधात शिंदे गटानंही(Eknath Shinde) याचिका केलीय. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड करण्याच्या विरोधातही शिवसेनेची याचिका आहे. शिंदेंना गटनेते पदावरुन हटवणे आणि गोगावलेंचं मुख्य प्रतोदपद रद्द करण्याच्या विरोधातही शिंदे गटानं याचिका केलीय. त्यामुळं सुप्रीम कोर्ट फैसला सुनावणार की प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवणार याचाही निर्णय होईल. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) ही लढाई निष्टा विरुद्ध पैसा असल्याचं म्हटलंय. एकीकडे सुप्रीम कोर्टात सुनावणी…तर दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि शिंदे गटाचा सामना असेल. शिवसेना नेमकी कोणाची ?, यासंदर्भात दोन्ही बाजूकडून कागदपत्रं सादर झालीत..त्यामुळं कोर्टाच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगही सुनावणी घेईल.

Published on: Aug 22, 2022 11:42 PM