शिवाजी आढळराव पाटलांनी धनुष्यबाण सोडलं, आता हाती घेतलं घड्याळ

शिवाजी आढळराव पाटलांनी धनुष्यबाण सोडलं, आता हाती घेतलं घड्याळ

| Updated on: Mar 26, 2024 | 6:55 PM

शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील लढणार आहे

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण सोडत आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार अशा चर्चांनी जोर धरला होता. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील लढणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत रंगताना बघायला मिळणार आहे.

Published on: Mar 26, 2024 06:55 PM