अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट, खोकेसम्राट, पलटीसम्राट आणि…; कुणी केली जहरी टीका?
महाविकास आघाडीची एक सभा झाली. या सभेत अजित पवारांनी केलेल्या टीकेवर अमोल कोल्हेंनी पलटवार केला होता. ते म्हणाले होते, 'नटसम्राट असणं कधीही चागंलं पण धोकेसम्राट , खोकेसम्राट , पलटीसम्राट कधीही असू नये', याच अमोल कोल्हेंच्या टीकेवर शिवाजीराव अढळराव पाटील यांच्याकडून पलटवार
अमोल कोल्हे हे महागद्दार आहेत, असं म्हणत शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर जहरी टीका केली आहे. अमोल कोल्हे यांनी मतदारसंघासाठी १ रूपया देखील निधी आणला नाही, असंही वक्तव्य शिवाजीराव अढळराव पाटील यांनी केलंय. महाविकास आघाडीची एक सभा झाली. या सभेत अजित पवारांनी केलेल्या टीकेवर अमोल कोल्हेंनी पलटवार केला होता. ते म्हणाले होते, ‘नटसम्राट असणं कधीही चागंलं पण धोकेसम्राट , खोकेसम्राट , पलटीसम्राट कधीही असू नये’, याच अमोल कोल्हेंच्या टीकेवर शिवाजीराव अढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना हल्लाबोल केलाय. अढळराव पाटील म्हणाले, ‘अमोल कोल्हे हे स्वतःच्या उपमा ते दुसऱ्याला देतायत. आधी गद्दार म्हणत होते. पण आता दिलीप मोहिते पण सभेत म्हणाले होते की, अमोल कोल्हे महागद्दार आहे. ५ वर्ष ते मतदारसंघात ते फिरले नाहीत एक रुपयाचा निधी आणला नाही.. धोकेसम्राट, खोकेसम्राट, पलटीसम्राट हे उपमा स्वतःची स्वतःला देत आहेत.. १९ हजार कोटीचा निधी आणल्याच सांगतात हे फेकामफाक आहे’, असे म्हणत त्यांनी कोल्हेंवर घणाघात केला तर रेकॉर्ड ब्रेक मतांनी मी विजयी होणार असल्याचा विश्वासही आढळराव पाटलांनी व्यक्त केला.