अमोल कोल्हे यांच्या पराभवासाठी अजितदादा गटातून 'हा' खंदा पाठीराखा शिरूर लोकसभेची जागा लढवणार?

अमोल कोल्हे यांच्या पराभवासाठी अजितदादा गटातून ‘हा’ खंदा पाठीराखा शिरूर लोकसभेची जागा लढवणार?

| Updated on: Dec 26, 2023 | 3:23 PM

अजित पवार यांनी शिरूरमतदार संघात उमेदवार देऊन तो विजयी करून दाखवणार असं आव्हान खासदार अमोल कोल्हे यांनी दिलंय. यानंतर आता अजित पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसतेय.

मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरमतदार संघात उमेदवार देऊन तो विजयी करून दाखवणार असं आव्हान खासदार अमोल कोल्हे यांनी दिलंय. यानंतर आता अजित पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसतेय. दरम्यान, शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिल्यानंतर अजित पवार नेमका कोणता उमेदवार शिरूर मतदार संघात कोल्हेंच्या विरोधात कोणता उमेदवार देणार याची जोरदार चर्चा रंगताना पाहायला मिळत असताना अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी अजित पवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे.

Published on: Dec 26, 2023 03:23 PM