Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् ‘त्याची’ गाडी जप्त
अजित पवार जेव्हा संतोष देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या मागे जो व्यक्ती उभा होता, शिवलिंग मोराळे याचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलाय.
अजित पवार यांनी जेव्हा संतोष देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन केलं. तेव्हा त्यांच्या मागे जो व्यक्ती उभा होता. त्याच व्यक्तीच्या गाडीने वाल्मिक कराड CID ऑफिसमध्ये जात सरेंडर झाला. विशेष म्हणजे त्याच व्यक्तिच्या गाडीतून फरार झाल्याचा दावा एसआयटीने केला. तरी देखील गाडी जप्त करून गाडी मालकाला सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार जेव्हा संतोष देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या मागे जो व्यक्ती उभा होता, शिवलिंग मोराळे याचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलाय. गर्दी कोणी उभं राहवं यावर अजित पवार यांचं नियंत्रण नसलं तरी बीड प्रकरणात कोण कोणत्या वेळी उपस्थित होतं त्याच्या अनेक रंजक स्टोरीज् आता बाहेर येऊ लागल्यात. एकीकडे बीड प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात आहे. कराड अनेक दिवसांपासून फरार होता. त्यादरम्यान, अजित पवार यांनी मस्साजोगला भेट दिली. तेव्हा स्वतः धनंजय मुंडे आणि कराडचा कट्टर समर्थक मनवणारा शिवलिंग मोराळे हा अजित पवार आणि संतोष देशमुख कुटुंबीयांचा संवाद कान देऊन ऐकत होता. विशेष म्हणजे या शिवलिंग मोराळे याच्या कारमधून वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट