Pune Maharashtra Kesari : शिवराज राक्षेची अंतिम फेरीत धडक, कोण होणार महाराष्ट्र केसरी?
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गादी विभागातून दमदार कामगिरी करत शिवराज राक्षे अंतिम फेरीत. यानंतर आता अंतिम फेरीतील मल्ल एकमेकांशी लढून महाराष्ट्र केसरी किताबसाठी दावेदारी करणार दाखल
पुण्याच्या शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम गटात धडक मारली आहे. हिंगालीच्या गणेश जगतापवर 11-1 अशी मात करून शिवराजने ही बाजी मारली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची आज, शनिवारी अंतिम लढत रंगणार असून कोण होणार महाराष्ट्र केसरी याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी शिवराज राक्षेच्या खांद्याला दुखापत झाल्याने शिवराज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र यंदा नव्या जोमाने या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि विजयी होऊन गदा घेऊन जायची हे स्वप्न असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
अंतिम फेरीत धडक मारल्याबद्दल शिवराज राक्षेने कुटुंबासह तालमीतील मास्तर आणि मित्र मंडळींचे आभार देखील मानले. दरम्यान, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गादी विभागातून दमदार कामगिरी करत शिवराज राक्षे अंतिम फेरीत सहभागी झाला आहे. तर आता अंतिम फेरीतील मल्ल एकमेकांशी लढून महाराष्ट्र केसरी किताबसाठी दावेदारी दाखल करणार आहे.