शिवरायांचा 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडावर स्वच्छता मोहीमेला सुरुवात
350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर तयारी सुरु आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शिवभक्तांच्या हातांनी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.
रायगड : 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर तयारी सुरु आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शिवभक्तांच्या हातांनी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविली जात आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, “350 वा राज्याभिषेक सोहळा तारखेनुसार होणार आहे. त्याकरिता स्वच्छता मोहीम राबवणं गरजेचं आहे. त्याकरता तयारी करणं गरजेचं आहे. आता झालेला सोहळा हा तिथीप्रमाणे झाला आहे, त्यामुळे आता गड स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे.आताच पोलिसांसोबत बैठक झाली ही समन्वयाची बैठक झाली आहे.संभाजीराजे यांनी 17 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात केली होती आणि तेव्हा काहीच मावळे होते आता ही संख्या लाखोंच्या घरात गेली आहे”, असं म्हणाल्या.