दादरच्या शिवाजीपार्कातील शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला भगदाड, व्हिडीओ फोटो व्हायरल
दादर, मुंबईतील शिवाजी पार्कमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्प खराब अवस्थेत आहे. शिल्पाच्या भिंतीला तडे आणि भेगा पडल्या आहेत. रंग उडाल्याने शिल्पाची दयनीय अवस्था झाली आहे. हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीसाठी उभारण्यात आले होते, परंतु पालिकेच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे त्याची ही अवस्था झाली आहे. या शिल्पाच्या देखभालीची जबाबदारी कोण घेणार हे मोठे प्रश्नचिन्ह आहे
मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क मधील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाला तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं शिल्प लावलेल्या भिंतीला भगदाड पडलंय. पालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय. मुंबईतील दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्कात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाला तडे गेलेले आहेत. भगदाड पडलेले आहे. घाणेचे साम्राज्य असल्याचे दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोहण पुतळा ज्या ठिकाणी अगदी त्याच्या समोरच्या बाजूलाच हे शिल्प उभारण्यात आलेलं आहे आणि छत्रपतींची एक आठवण म्हणून हे शिल्प उभारण्यात आलं होतं. मात्र या शिल्पाची दयनीय अवस्था सध्या झाली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं शिल्प लावलेल्या भिंतीला भगदाड पडलं असून भिंतीचा रंग उडालेला आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी हे शिल्प या ठिकाणी उभारण्यात आलं. पण याकडे ना महानगरपालिकेचे ना पी डब्ल्यूडी विभागाचे लक्ष नसल्याचे पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं काम करतंय का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय आणि याची जबाबदारी नेमकी कोण घेणार हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.