Special Report | शरद पवार-मोदींच्या भेटीनंतर शिवसेना अलर्ट?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Narendra Modi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दिल्लीत भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Narendra Modi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीची चर्चा सुरुच असताना, तिकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोघेही उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी एकाच गाडीतून रवाना झाले. संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरु होणार आहे. 13 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. (ShivSena alert after Sharad Pawar-Narendra Modi meeting)
या पार्श्वभूमीवर दिल्लीत नेत्यांची रेलचेल सुरु आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीला महत्त्व आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. सातत्याने काँग्रेस आक्रमक होत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार वेगळं समीकरण जुळवतात का असा तर्क लढवला जात आहे.
शरद पवारांचं मोदींना पत्र
दरम्यान, शरद पवारांनी मोदींच्या भेटीत बँकिंग सुधारणा कायद्याबाबत पत्र लिहिलं आहे. सहकार क्षेत्रांतील बदलामुळे सहकारी बँकांसमोर निर्माण होणाऱ्या समस्या, सहकारासंबंधी कायद्यांसंबधी बदलांबाबतचे आक्षेप यासंबंधी निवेदन पवारांनी मोदींना दिलं आहे.
सहकार आणि बँकिंग कायद्यातील सुधारणांचं स्वागत आहे. पण अधिनियमातील मूलभूत तरतुदींमध्ये काही विसंगती आहेत. जे विशेषत: 97 व्या घटनादुरुस्तीमध्ये राज्य सहकारी संस्था अधिनियम आणि सहकारी तत्त्वांमध्ये आढळतात. सुधारित कायद्याची उद्दीष्टे चांगल्या हेतूने आहेत. त्यातील बर्याच तरतुदी आवश्यक आहेत. बोर्ड आणि व्यवस्थापन निश्चितपणे कठोरपणे कारवाई केली पाहिजे आणि ठेवीदारांचे हित संरक्षित केले पाहिजे. परंतु त्याच वेळी हे सुनिश्चित केले पाहिजे की असे करताना घटनेत नमूद केलेल्या सहकारी तत्त्वांचा बळी दिला जाऊ नये, असं शरद पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
शरद पवार हे देशातील प्रमुख नेते आहेत. ते कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळे ते जेव्हा पंतप्रधानांना भेटतात तेव्हा त्यात राजकारण का काढता?, असा सवाल करतानाच पवार अधूनमधून पंतप्रधानांना भेटत असतात. त्यामुळे यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
प्रत्येक भेट राजकीयच असते असं नाही : अरविंद सावंत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीपूर्वी पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातसुद्धा भेट झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीगाठीचे नेमके कारण काय असावे असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक भेट ही राजकीयच असते असे नाही. काही वेळा देशहितासाठी, सामाजिक भेटीही होतात, असे सावंत म्हणाले.
इतर बातम्या
Breaking | संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, भेटीनंतर राऊत-पवार एकाच गाडीतून निघाले
(ShivSena alert after Sharad Pawar-Narendra Modi meeting)