शिवसेनेवर एकतर्फी निर्णय? उद्धव गट दिल्ली हायकोर्टात, याचिकेतले 5 महत्त्वाचे मुद्दे
आज ही याचिका मेंशन केली आहे. उद्या दिल्ली हायकोर्टात ही याचिका सुनावणीसाठी येईल, असं ते म्हणाले.
संदीप राजघोळकर, नवी दिल्लीः शिवसेनेचं (Shivsena) पक्ष चिन्ह गोठवण्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) घाई केली, एकतर्फी निर्णय दिला, असा आरोप करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आज कोर्टात गेला आहे. या गटाचे नेते अनिल देसाई यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला. निवडणूक आयोगाने हा निर्णय देण्याआधी आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती, अशी मागणी उद्धव ठाकरे गटातर्फे या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
अनिल देसाईंनी आज दिल्ली हायकोर्टात ही याचिका दाखल केली. उद्या कोर्टाच्या कामकाजात ही याचिका पटलावर येण्याची शक्यता आहे. अनिल देसाईंनी याचिकेत काय म्हटलंय यातील 5 महत्त्वाचे मुद्दे-
- निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशानुसार, आम्ही पक्षाचं नवीन नाव आणि चिन्हासाठीचे तीन पर्याय सादर केले आहेत. मात्र हा निर्णय़ देण्यात आयोगाने घाई केली, असे आम्हाला वाटते.
- प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसला कुठेतरी बाधा येणारा निर्णय वाटतोय, असे आमचे मत आहे.
- केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. घटनाक्रम लक्षात घेता, यात काहीतरी चुकीचं होतंय, असं वाटतंय. शनिवारी सर्व कागदपत्र मागवले. ते निवडणूक आयुक्तांसमोर शनिवारीच सादर केले आणि शनिवारी रात्रीच निर्णय दिला.
- आमची अपेक्षा होती की, याला काही पास्ट रेफरन्स पाहता, आम्हाला आमचं म्हणणं मांडू देण्याची गरज होती. किंवा आयोगामार्फत काही विचारणा करण्याची गरज होती. तसं काहीही न करता अंतरिम आदेश दिलाय. यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केली आहे.
- आज ही याचिका मेंशन केली आहे. उद्या दिल्ली हायकोर्टात ही याचिका सुनावणीसाठी येईल, असं ते म्हणाले.