शिवसेना नेत्याच्या खिशातील 50 हजारांचं बंडल चोरलं, पैसे चोरतानाचा व्हिडीओ आला समोर
शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल (Note bundle) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर ही घटना घडली. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये नुकताच ओबीसी मेळावा पार पडला.
सांगली : शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल (Note bundle) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर ही घटना घडली. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये नुकताच ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी वडेट्टीवार स्टेजवर उपस्थित असतानाच हा प्रकार घडला. चोरट्याने सेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील नोटा लांबवतानाची घटना (Sangli Theft) कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरट्याने चोरलं. सांगलीच्या स्टेशन चौकात काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले

धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम

दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत

अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
