एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला; म्हणाले, आज शिमगा मेळावा…
VIDEO | आज मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दसरा मेळाव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे, अशातच शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबई, 24 ऑक्टोबर 2023 | आज मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दसरा मेळाव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदान तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजीपार्क अर्थात शिवतीर्थावर होणार आहे. या दोन्ही मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे यांचा आज शिमगा मेळावा होणार आहे, असे म्हणत शिंदे यांच्याकडून टीकास्त्र सोडण्यात आलंय. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली. यासह दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा देखील शिंदे यांनी घेतला. यावेळी शिंदे म्हणाले. आजचा दसरा मेळावा हा अभूतपूर्व आणि आजची सभा रेकॉर्ड ब्रेक होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.