Dasara Melava 2023 : आव्वाज कुणाचा? ठाकरे की शिंदे यांचा? मुंबईत आज २ मोठे मेळावे अन् पोलीसही सज्ज

Dasara Melava 2023 : आव्वाज कुणाचा? ठाकरे की शिंदे यांचा? मुंबईत आज २ मोठे मेळावे अन् पोलीसही सज्ज

| Updated on: Oct 24, 2023 | 8:22 AM

VIDEO | मुंबईमध्ये आज दोन मोठे मेळावे पार पडणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदान तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजीपार्क अर्थात शिवतीर्थावर होणार आहे. या दोन्ही मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | मुंबईमध्ये आज दोन मोठे मेळावे पार पडणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदान तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजीपार्क अर्थात शिवतीर्थावर होणार आहे. या दोन्ही मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचे दोन मेळावे होणार आहे. दोन्ही गटाकडून मोठं शक्तिप्रकदर्शन होणार आहे. यंदा या दसरा मेळाव्याचा दुसरं वर्ष असून दोन गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी देखील पूर्ण झाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाकडून आमच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर या मेळाव्यासाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत. या दोन्ही मेळाव्या करता एकूण १२ हजार ४४९ पोलीस अंमलदारांसह २ हजार ४९३ पोलीस अधिकारी बंदोबस्तात असणार आहे. ६ अप्पर पोलीस आयुक्त, १६ पोलीस उपायुक्तांसह ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

Published on: Oct 24, 2023 08:19 AM