शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी, कुठे घडला प्रकार? बघा व्हिडीओ
अब्दुल सत्तार यांनी नवरात्रानिमित्त महिलांना साड्यांचे वाटप केले होते. यानंतर साड्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता. यामध्ये संतप्त महिलांनी साड्यांची होळी केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. राजकीय नेते मंडळींकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी विविध युक्त्या देखील लढवल्या जात आहे. अशातच राज्यात लाडकी बहीण योजनेची सर्वाधिक चर्चा महिला वर्गात असून विरोधक मात्र या योजनेवर टीका करत आहेत. तर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या आहेत. मात्र या साड्या मिळताच महिलांनी या साड्यांची राख रांगोळी केली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गावातील महिलांना अब्दुल सत्तार यांनी साड्यांचे वाटप केले होते. मात्र अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची महिला आणि गावकऱ्यांनी मिळून होळी केली आहे. या प्रकाराचे व्हिडीओ सोशल मिडीयावरही व्हायरल होत आहे.