राज ठाकरेंचा फोटो पोस्ट करत शिवसेनेच्या अंबादास दानवेंचा हल्लाबोल
केंद्राच्या दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूच्या वाढत्या महागाईमुळे गोर गरिबांचा संसार विस्कटला आहे. यावर बोलायचे सोडून धार्मिक अराजक कसे माजेल यावर राज ठाकरे बोलले असल्याचं अंबादास दानवे म्हणैले.
कोरोना नंतरच्या काळात आज जनतेच्या पोटावर पोटतिडकीने बोलेल आणि त्या नुसार कृती करेल तो खरा लोकनेता आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. तर, आज जात,धर्म,प्रांत भेद करण्याची ही वेळ नाही.लोकांची रोजी रोटी हिसकावून घेतली गेली आहे.व्यावसाय बुडाले आहे, नोकऱ्या जाऊन बेकारी वाढली आहे.महागाई चा आगडोंब भडकला आहे.केंद्राच्या दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूच्या वाढत्या महागाईमुळे गोर गरिबांचा संसार विस्कटला आहे. यावर बोलायचे सोडून धार्मिक अराजक कसे माजेल यावर राज ठाकरे बोलले असल्याचं अंबादास दानवे म्हणैले.
Latest Videos