सरकारमध्ये मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर, अब्दुल सत्तारांवर कारवाई करणार?

सरकारमध्ये मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर, अब्दुल सत्तारांवर कारवाई करणार?

| Updated on: Dec 22, 2024 | 5:26 PM

संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीचा अहवाल देखील संजय शिरसाट यांनी मागवला असल्याची माहिती आहे. संजय शिरसाट यांनी माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना नाव न घेता असा इशारा दिला आहे.

राज्यात महायुतीला प्रचंड बहुमतांनी विजय मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं मिळालं आहे. अशातच सरकारमध्ये मंत्री बनताच संजय शिरसाट हे अ‍ॅक्शन मोडवर आलेत. शासकीय निधीचा दुरूपयोग करणाऱ्या व्यक्तींवर करवाई करणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीचा अहवाल देखील संजय शिरसाट यांनी मागवला असल्याची माहिती आहे. संजय शिरसाट यांनी माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना नाव न घेता असा इशारा दिला आहे. “कुणीही पालकमंत्री असो, आमदार असो की खासदार असो, शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणार. जर असमान निधीचा वाटप झाला असेल तर कारवाई होणार. डीपीडीसीचा अहवाल मागितला आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. तर अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मी पुन्हा येईन, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावरही संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “अडीच वर्षानंतर ते बोलले मी परत येणार, त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील”, असं संजय शिरसाट म्हणाले.

Published on: Dec 22, 2024 05:26 PM