‘सकाळी उठून बदनामी करणं हा काहींचा धंदा’, संजय राऊत यांच्यावर नाव न घेता कुणाचा घणाघात
VIDEO | संजय राऊत यांच्या 'त्या' कृत्यावरून शिवसेना नेत्याची संजय राऊत यांच्यावर टीका
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना माध्यमांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर प्रश्न विचारला असता त्यांच्यावर बोलण्यापूर्वी संजय राऊत थुंकल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यावर शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती काय असते आणि राज्य संस्कार काय असते हे दोन्ही अखंड महाराष्ट्र दाखवून दिले आहे. त्यांच्या नंतरही अनेक नेते झाले, पण मी कधीच खालच्या पातळीवरचा राजकरण आणि खालच्या पातळीवरची वक्तव्ये पाहिली नाहीत, अशी खंत उदय सामंत यांनी व्यक्त केली. तर पुढे ते असेही म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या प्रश्नावर थुंकणे हा पत्रकारांचा अपमान आहे. सकाळी ९ वाजता उठून बदनामी करणे, काही लोकांवर शिवीगाळ करणं हा काही लोकांचा धंदा झाला आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. अशा लोकांवर भाष्य करणे हे त्या लोकांना त्यांच्या पात्रतेपेक्षा अधिक महत्त्व देण्यासारखे असल्याचे म्हटले आहे.