पुन्हा एकदा शिवसेना नाकानाक्यावर, भाजपची करणार पोलखोल, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची घोषणा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेन वाढवली. नाकानाक्यावरून झळकणारे शिवसेनेची फलक यामुळे अनेकजण शिवसेनेत सामील झाले. शिवसेनेची हीच कार्यपद्धती पुन्हा अवलंबिण्यात येणार आहे. काय असणार ही कार्यपद्धती याबद्दल शिवसेना नेत्याने महत्वाची माहिती दिलीय.
कोल्हापूर : 4 ऑक्टोबर 2023 | कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. अशा घटना घडू नये यासाठी सर्व धर्मियांना शांतत राखावी. ज्यांनी ज्यांनी भाजपला जवळ केलं त्यांचे भाजपने वाटोळे केलं. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात दंगली होण्याची शक्यता आहे, असे खळबळजनक विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलंय. ओरिजनल शिवसेना कोणाची आहे? खऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर गेल्यावेळेस झाला होता. ठाकरे आणि शिवाजी पार्कचे मैदान ह्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे त्यावर कोणी डाग लावू नये असा टोला त्यांनी लगावला. भाजपने सबका साथ सबका विकास अशी घोषण केली. पण, विकास कुणाचा झाला? मोदी यांनी अदानी आणि अंबानी यांचा विकास केला. सबका साथ म्हणताना विकास फक्त आपल्या चेलेचेपाटी यांचा करायचा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षाच्या काळात काय केले याची माहिती शिवसेना नाकानाक्यावर उभे राहून देणार अशी घोषणा त्यांनी केली.