‘खासदाराला साधा अर्ज भरता येत नाही, याला काय म्हणावं’, गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला

| Updated on: Oct 24, 2021 | 8:17 PM

एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्यानं असा आरोप केला तर ठीक आहे. पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही गुलाबराव पाटील यांनी केलाय.

जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसलाय. भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. यावरुन शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रक्षा खडसे यांना जोरदार टोला लगावलाय. खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्यानं असा आरोप केला तर ठीक आहे. पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही गुलाबराव पाटील यांनी केलाय.