Gulabrao Patil | ओबीसींच्या नादी लागाल तर भस्म व्हाल, गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य

| Updated on: Sep 25, 2021 | 7:02 PM

हे आरक्षण संपू द्यायचे नसेल तर जो नेता या लढ्यात पुढे उभा राहिला आहे, त्याच्या पाठिशी आपल्याला उभे रहावे लागेल. ओबीसींना त्यांचा हक्क आज मिळालेला नाही तर त्यांना तो बाबासाहेबांनी दिला आहे. ओबीसींच्या नादी लागल तर भस्म व्हाल, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

जळगाव : जो शेती करतो, तो ओबीसी. देशात जादूटोणा चालला आहे, तो आपल्याला संपवावा लागणार आहे. भुजबळ यांच्यासोबत आम्ही आहोतच. ओबीसींच्या लढ्यासाठी हा जिल्हा नेहमी तुमच्या मागे असेल, अशी ग्वाही मी पालकमंत्री या नात्याने याठिकाणी देतो. ओबीसींच्या लढ्यासाठी भुजबळांनी पूर्वीपासून जो त्याग केला आहे, त्यावर आपण तासनतास बोलू शकतो. निवडणुका लागल्या आणि ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुकांचा विचार केला तर मग… आम्हाला फक्त निवडणुकांचा विचार करायचा नाही तर राज्यात 62 टक्के ओबीसी आहेत. मग आम्हाला आरक्षण दिलेच पाहिजे. यांना देशातील आरक्षण संपवायचे आहे. हे आरक्षण संपू द्यायचे नसेल तर जो नेता या लढ्यात पुढे उभा राहिला आहे, त्याच्या पाठिशी आपल्याला उभे रहावे लागेल. ओबीसींना त्यांचा हक्क आज मिळालेला नाही तर त्यांना तो बाबासाहेबांनी दिला आहे. ओबीसींच्या नादी लागल तर भस्म व्हाल, असे गुलाबराव पाटील म्हणाले.