Gulabrao Patil | जो जेलमध्ये जात नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही : गुलाबराव पाटील
शिवसेनेत आलो आणि अकराव्या दिवशी जेल मध्ये गेलो, जो जेलमध्ये जात नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही, असं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले. जे पोलीस आम्हाला गली गलीत धुंडायचे, आज काय हवा आहे पहा, माघे पोलीस पुढे पोलीस त्यांचं माझं नातं कधी संपलं नाही.
शिवसेनेत आलो आणि अकराव्या दिवशी जेल मध्ये गेलो, जो जेलमध्ये जात नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही, असं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणाले. जे पोलीस आम्हाला गली गलीत धुंडायचे, आज काय हवा आहे पहा, माघे पोलीस पुढे पोलीस त्यांचं माझं नातं कधी संपलं नाही. पूर्वी शिवसेना गावामध्ये आली की गुंडांची सेना असं चित्र होतं आज काय परिस्थिती आहे, माझ्या गावात 40 टक्के मुस्लिम आहेत एक सुद्धा फुटत नाही. मुस्लिम बांधवांना सगळं लक्षात यायला लागलं आता, माझ्या गावात सरपंच मुस्लिम आहे. मुस्लिमांशी आमचं वैर नाहीच, मुस्लिमांच्या बाबतीत आम्ही कधीच वाईट विचार केला नाही. हिंदू मुस्लिम ही भानगड लावणारे वेगळे लोक आहेत. पाकिस्तानमध्ये पाऊस पडला तर भारतात छत्री कशाला उघडायची. 800 स्क्वेअर फुटांच्या घरात मी 30 वर्षे राहिलो आणि मी एक सरपंच पहिला सहा महिन्यांत बिल्डिंग, कुणीही आमच्यावर टीका करतं, पण यांचं असं असतं यांना पोरगं होत नाही, दुसऱ्याला झालेलं पचत नाही.