सभा घेणं त्यांचं काम, त्यांचं काम ते करतील अन्…, शिवसेनेतील मंत्र्यानं उद्धव ठाकरे यांना डिवचलं
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीतील खेडच्या जाहीर सभेवरून शिवसेनेतील मंत्र्यानं केली खोचक टीका, बघा काय म्हणाले?
जळगाव : विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आज रत्नागिरी खेड येथे पहिलीच सभा घेणार आहे. यासभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. आज उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड येथे सभा होणार असल्याने शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. या सभेआधीच शिवसेनेतील मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सभा घेणे हे उद्धव ठाकरे यांचं काम आहे. त्यांचं काम ते करतील आम्ही आमचं काम आम्ही करू, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
Published on: Mar 05, 2023 06:01 PM
Latest Videos