पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील घटक पक्षांना इशारा

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील घटक पक्षांना इशारा

| Updated on: Dec 10, 2021 | 10:42 AM

आगामी महापालिका निवडणुकीत मित्रपक्ष सोबत आले तर ठीक, नाही आले, तर आम्ही स्वबळावर आणि पक्ष संघटनेच्या जीवावर काम करु, असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलं. पिंपरी-चिंचवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते.

पिंपरी चिंचवड : महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune Pimpri Chinchwad) आमच्या मित्रपक्षाला पूर्णपणे सोडलेले नाही, असा सूचक इशारा शिवसेनेचे (Shiv Sena) पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) दिला आहे. जवळपास अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकर सचिन अहिरांनी शिवबंधन हाती बांधले होते. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विधानसभा निवडणूक (Worli Vidhansabha) जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो. आगामी महापालिका निवडणुकीत मित्रपक्ष सोबत आले तर ठीक, नाही आले, तर आम्ही स्वबळावर आणि पक्ष संघटनेच्या जीवावर काम करु, असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलं. पिंपरी-चिंचवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते.

Published on: Dec 10, 2021 10:42 AM