Sanjay Rathod :  माजी मंत्री संजय राठोड यांना कोरोना संसर्ग, उपचारासाठी मुंबईला हलवलं

Sanjay Rathod : माजी मंत्री संजय राठोड यांना कोरोना संसर्ग, उपचारासाठी मुंबईला हलवलं

| Updated on: Jan 17, 2022 | 10:10 AM

शिवसेना नेते माजी मंत्री आमदार संजय राठोड यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. संजय राठोड यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचं कळतंय.

शिवसेना नेते माजी मंत्री आमदार संजय राठोड यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. संजय राठोड यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचं कळतंय. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानं त्यांना मुंबईला हलवण्यात आल्याची माहिती आहे. संजय राठोड यांच्यावर आता मुंबईतील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. दरम्यान राज्यात दररोज चाळीस हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत असून राजकीय नेत्यांना कोरोना संसर्ग सुरुच आहे.