370 कलम काढल्यावरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, Sanjay Raut यांनी डिवचले

370 कलम काढल्यावरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, Sanjay Raut यांनी डिवचले

| Updated on: Mar 20, 2022 | 12:58 PM

'द काश्मीर फाईल्स' या सिनेमावरून सुरू असलेला वादाचा धुरळा अजूनही बसलेला नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काश्मीर पंडितांच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई: ‘द काश्मीर फाईल्स’ (the kashmir files) या सिनेमावरून सुरू असलेला वादाचा धुरळा अजूनही बसलेला नाही. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा काश्मीर पंडितांच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी हिमतीने काश्मिरातील 370 कलम रद्द केले. काश्मिरातून लेह-लडाख वेगळे केले व काश्मीरला सरळ केंद्रशासित राज्य बनवले. काश्मिरातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे काम संपले आहे. या पद्धतीने जम्मू प्रांतातील विधानसभेच्या जागा वाढतील व त्या प्रांताचा मुख्यमंत्रीसुद्धा एखादा हिंदू होईल. हे चित्र चांगले आहे, पण नव्वदच्या दशकात परागंदा झालेल्या काश्मिरी पंडितांची ‘घरवापसी’ हा मोदी सरकारचा (modi government) मोठा कार्यक्रम होता. 370 कलम काढल्यावरही पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही. हे कोणाचे अपयश आहे?, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. तसेच काश्मिरी पंडितांवरील अन्यायावरून आक्रोश करणाऱ्यांना राऊत यांनी थेट 9 सवाल केले आहेत.

Published on: Mar 20, 2022 12:58 PM