Sanjay Raut | पेगाससवर केंद्र सरकार चर्चा करायला तयार नाही : संजय राऊत
पेगासस हे गंभीर प्रकरण असल्याचं खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही म्हटलं असून त्यावर कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, केंद्र सरकार त्यावर चर्चा करायला तयार नाही, असं सांगतानाच हे सरकार जर सर्वोच्च न्यायालयाचं ऐकत नाही. हे सरकार देशातील चारही प्रमुख स्तंभ मोडित काढायला निघालं आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रावर चढवला.

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना पेगाससच्या मुद्द्यावरून केंद्रावर जोरदार हल्ला चढवला. विरोधी पक्ष काय सांगतो, त्यांच्याकडे काय माहिती आहे, सरकारकडे काय माहिती आहे, यावर चर्चा झाली तर हा विषय किती गंभीर आहे हे समजेल. पण सरकार सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकत नसेल तर हे सरकार या देशातील चारही प्रमुख स्तंभ मोडित काढायला निघालं आहे. कुणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिकपणाची नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकायला सरकार तयार नसेल तर सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे या भूमिकेत सरकार आहे. पेगाससचा विषय गंभीर आहे हे न्यायालय म्हणत असेल तर यासाठी अजून कोणत्या न्यायालयात आम्ही जायचं?, असा राऊत यांनी केला.