संजय राऊत-एकनाथ शिंदे लखनौमध्ये दाखल

संजय राऊत-एकनाथ शिंदे लखनौमध्ये दाखल

| Updated on: Jun 05, 2022 | 7:32 PM

शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे हे लखनौ विमानतळावर दाखल झाले आहेत.

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे हे लखनौ विमानतळावर दाखल झाले आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी संजय राऊत यांचा हा आढावा दौरा आहे. 15 जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत. काही दिवसांपूर्वी अयोध्या दौऱ्यावरुन राज्यातील राजकारण तापलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौरा जाहीर करण्यात आला. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदाराने जोरदार विरोध केला. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय पाय ठेवू देणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला पाच जूनचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित केला होता.

Published on: Jun 05, 2022 07:32 PM