Sanjay Raut | अनिल परबांना ईडीची नोटीस, कायदेशीर लढाई लढू : संजय राऊत

| Updated on: Aug 29, 2021 | 8:52 PM

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस (Anil Parab ed notice) बजावल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ईडीने येत्या मंगळवारी म्हणजेच 31 ऑगस्टला परब यांना ईडीच्या कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. “आम्ही गुन्हेगार नाही आहोत. आम्ही कशालाही घाबरत नाही. ही सगळी लढाई कायद्यानेच लढवली जाईल, असे राऊत म्हणाले आहेत. शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.