जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीसोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते झालेत?; शीतल म्हात्रे यांचा सवाल
VIDEO | मालेगाव संदर्भात केलेली टिका जितेद्र आव्हांडाना का झोंबली? शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा हल्लाबोल
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यात कालपासूनच ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याबाबत बोलताना शीतल म्हात्रे म्हणाल्या, पहिली टीका मालेगावच्या सभेबाबत होती. त्याच्या मिरच्या आव्हाडांना का झोंबल्या ते कळलं नाही. कारण पहिलं उत्तर त्यांनी दिलं. राष्ट्रवादीचं काम करता करता त्यांनी ठाकरे गटाचे प्रवक्तेपद घेतलं की काय असं वाटायला लागलं. त्यांना या संदर्भात बोलण्याची गरज नव्हती. पण त्यांनी नसता खटाटोप केला, अशी टीका त्यांनी म्हटलं. तर जेव्हा मुद्दे संपतात आणि बोलण्यासारखं काही राहत नाही. तेव्हा महिलांच्या चारित्र्यावर बोलणं फार सोपं असतं. तेच सातत्याने होत आहे. जेव्हा तुमच्यावर अन्याय झाला ते आम्ही पाहत होतो. आमच्यावर बोलताना तुम्हाला तुमच्या घरची स्त्री आठवली नाही का? तुमची पत्नी आणि मुलगी आठवली नाही का? अशा प्रकारे बोलणं अपेक्षित नव्हतं. पण उगीचच खाजवून खरून काढण्याचं काम त्यांनी केलं. मिळत नसलेलं महत्त्व परत मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.