किरण सामंत यांच्याकडून मशालीचं चिन्ह स्टेटसला अन्… म्हणाले, ‘उदय सामंत यांचं करिअर बरबाद…’
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या भावाने व्हॉट्सअपला ठेवलेल्या एका स्टेटसने अनेक चर्चा सुरू, मशाल चिन्ह स्टेटसला ठेवून फोटो डिलीट केल्याचे पाहायला मिळाले. उदय सामंत हे शिंदे गटात गेल्यानंतर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील राजकारणात झाले सक्रिय
रत्नागिरी, २९ सप्टेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री उदय सामंत यांच्या भावाने किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉटसअप स्टेटसवर ठेवलेल्या एका स्टेटसने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. उदय सामंत यांनी बंड केल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यागटात आलेत तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील भाऊ उदय सामंत यांच्यासोबत राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्यांच्या एका स्टेटनं पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. किरण सामंत यांनी आपल्या स्टेटसला मशाल हे चिन्ह ठेवले होते. मात्र याची चर्चा सुरू झाल्यावर त्यांनी मशालीच्या चिन्हाचं स्टेटस डिलीट करून टाकले. यावर बोलताना ते म्हणाले, ‘होय मी मशालीचं चिन्ह स्टेटसला ठेवले होते. पण उद्योगमंत्री उदय सामंत यांचे राजकीय करिअर बाद होऊ नये म्हणून हे स्टेटस मी मागे घेतले आहे. पण लवकरच मी यावर बोलणार आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.