Ambadas Danve | औरंगाबादेत शिवसेना आमदार अंबादास दानवेंनी बेशिस्त रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली

Ambadas Danve | औरंगाबादेत शिवसेना आमदार अंबादास दानवेंनी बेशिस्त रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली

| Updated on: Jun 29, 2021 | 1:21 PM

शहरातील प्रमुख चौक असलेल्या क्रांती चौकात आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. चौकातील चारही बाजूंनी चारचाकी, दुचाकी आणि मोठ्या वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी जवळच शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात असलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आपल्या काही कार्यकर्त्यांसह क्रांती चौकात दाखल झाले आणि त्यांनी मोर्चा हाती घेतला.

शहरातील प्रमुख चौक असलेल्या क्रांती चौकात आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. चौकातील चारही बाजूंनी चारचाकी, दुचाकी आणि मोठ्या वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी जवळच शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात असलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आपल्या काही कार्यकर्त्यांसह क्रांती चौकात दाखल झाले आणि त्यांनी मोर्चा हाती घेतला. तिथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसाच्या मदतीनं आमदार दानवे यांनी क्रांती चौकातील वाहतूक कोंडी फोडली. यावेळी दानवे यांनी एका बेशिस्ट रिक्षाचालकाला चोपही दिला!

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांवरुन औरंगाबादेतील नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला. त्यामुळे दुपारी चार वाजेच्या आत घरी परतण्यासाठी औरंगाबादकरांची धावपळ पाहायला मिळाली. एकाच वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या उतरल्यामुळे शहरातील मुख्य चौक असलेल्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी झाली. तिथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसालही हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा जवळच्याच शिवसेना कार्यालयात उपस्थित असलेले आमदार महोदय क्रांती चौकात दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत केली.